भडगावात घराच्या बाजूला लावलेली कार चोरी; गुन्हा दाखल

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भडगाव शहरातील पाचोरा रोडवरील एच कॉलनीतून घराच्या बाजूला लावलेली  स्विफ्ट गाडी चोरीला गेल्याची घटना दि. 12 रोजी मध्यरात्री घडली. याबाबत भडगाव पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील पाचोरा रोड वरील एच कॉलनीतून घराच्या बाजूला लावलेली एक लाख रु. किमतीची पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट गाडी क्रमांक एम. एच. 19 सी. एफ.  5321, चेचीस नंबर 1918489, इंजिन नंबर C 28132 ही चारचाकी गाडी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या संमती वाचून लाबडीच्या इराद्याने चोरून नेली.

भडगाव पोलिस स्टेशनला अविनाश भास्कर भदाणे (वय 42, धंदा. शिक्षक, रा. एच कॉलनी भडगाव) यांच्या फिर्यादीवरून भाग 5 गु.र.न. 289 /2022  भा.द.वी.कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पो.हे. कॉ. विजय जाधव हे करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.