जळगावात दोन गटात हाणामारी ; ६ जणांविरुद्ध गुन्हा

0

जळगाव ;- कोणतेही कारण नसताना दोन गटात लोखंडी रॉड, लाकडी दांडा आणि बॅट यांचा वापर करून मारहाण झाल्याची घटना शहरातील गुरुनानक परिसरात ३ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली असून याबाबत ६ जणांविरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांची दिलेली माहीत अशी कि, माहिती अशी की, गुरुनानक नगर येथे बेंडवाल आणि शिंदे परिवार राहायला असून शनिवार ३ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता काहीही कारण नसताना जोगिंदर सुनील शिंदे आणि प्रवीण सुनील शिंदे दोन्ही रा. गुरुनानक नगर तर दुसऱ्या गटातील राजेश प्रभू बेंडवाल, सोजल राजेश बेंडवाल, रोहन राजेश बेडवाल आणि रवी दीपक चावरिया सर्व रा. गुरुनानक नगर यांच्यात लोखंडी रॉड, लाकडी दांडा आणि बॅटचा वापर करून एकमेकांना मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे परिसरात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता.

रविवारी ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाता याप्रकरणी पहिल्या गटातील प्रवीण सुनील शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेश बेंडवाल, सुजल बेडवाल, रोहन बेंडवाल आणि रवी चावरिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या गटातून सविता बेंडवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जोगिंदर शिंदे आणि प्रवीण शिंदे यांच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ प्रदीप नन्नवरे आणि पोहेकॉ शिकांत पाटील हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.