वाहन अडवल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने चालकाला मारहाण

0

जळगाव : गाडी अडविल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने चौघांकडून ट्रॅव्हल्स चालकाला शिवीगाळ करीत मारहाण केली. ही घटना दि. ९ जानेवारी रात्रीच्या सुमारास आयएमआर महाविद्यालयाजवळ घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.आयएमआर महाविद्यालयाजवळून पुणे जाण्यासाठी निघाले.

यावेळी सुनिल जगन तेली, तेजस सुनिल तेली, वरुन सुनिल तेली (सर्व रा. कोल्हे हिल्स) व आकाश संजय पाटील (कोल्हे हिल्स) यांनी संभाजी नगर जिल्ह्यातील फर्दापूर येथील शेख असीम शेख मुबिन (वय २८) हे एका ट्रॅव्हल्सवर चालक म्हणून काम करतात. दि. ९ जानेवारी रोजी ते (एमएच १९ सीवाय ५२२२) क्रमांकाची ट्रॅव्हल्स घेवूनचौघांनी शेख वसीम यांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, चालकाने जिल्हापेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन चौघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.