भुसावळ येथे चौघांनी केली एकास मारहाण ; गुन्हा दाखल

0

भुसावळ;- शहरातील अमृत कॉलनी येथे चार जणांनी एकाला भेट व लाठीकाठ्यांनी मारहाण करून दुखापत केल्याची घटना एक ऑक्टोबर रोजी चार ते साडेचार वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रावेर येथील मुकेश आधार सोनवणे वय 36 नोकरी करीत असून अमृत कॉलनी येथे संशयित पूजा किरण साळुंखे साळुंखे यांनी फिर्यादी मुकेश सोनवणे यांना तू माझ्या लग्नात भांडण केले होते त्याच्यामुळे मला आजही त्रास होत असल्याचे सांगून आरोपी मयूर मधुकर मोरे, वर्षा संतोष जाधव, संघर्ष संतोष जाधव आणि पूजा किरण साळुंखे साळुंखे यांनी बेसबॉलची खेळण्याची बॅट व लाठी काट्यांनी मुकेश सोनवणे यांना मारहाण केल्याचा प्रकार 1 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडला. याबाबत मुकेश सोनवणे यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला चौघांविरुद्ध 324 ,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोना शशिकांत तायडे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.