दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीला केली लाकडी दांड्याने मारहाण

0

मुक्ताईनगर दारू पिण्यासाठी पत्नीने पैसे न दिल्याने याचा राग आल्याने लाकडी दांड्याने तिच्या डोक्यात अंगावर जबर मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार तालुक्यातील लोहार खेडा येथे 23 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला याप्रकरणी मद्यपी पतीविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की लोहार खेडा येथील रहिवासी असलेल्या रंजना गोपाळ पानपाटील वय 25 ह्या शेत मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. 23 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांचे पती गोपाळ गणेश पानपाटील हे नेहमी दारू पिण्यासाठी पैसे मागत असताना त्यांनी पैसे ची मागणी केली मात्र पैसे न दिल्यामुळे याचा राग आल्याने गोपाळ पान पाटील याने घराच्या बाहेरून लाकडी दांडा आणून पत्नीच्या डोक्यात मारून दुखापत केली याप्रकरणी 26 जुलै रोजी रंजना पान पाटील यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.