रिक्षात भरण्यासाठी घरगुती गॅसचा काळाबाजार : एकावर गुन्हा

0

जळगाव :-शहरात अवैधरित्या घरगुती गॅसचा वापर करून हा गॅस रिक्षांमध्ये सर्रास भरल्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर  त्यांनी बळीराम पेठेतील दुर्गा माता मंदिरासमोर अवैधरित्या गॅस स्टेशन चालवणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून गॅस भरण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे .

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की बळीराम पेठेतील दुर्गा माता मंदिर समोर संशयित अन्वर नुरोड्डीन भिस्ती वय ४६ राहणार शाहूनगर हा 26 जुलै रोजी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास घरगुती गॅसच्या सिलेंडर मधून रिक्षात गॅस भरण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले.. त्याच्याकडून पंधरा हजार रुपये किमतीचे पिस्टन पंप त्यावर इलेक्ट्रिक मोटर त्यात एक पंप रेगुलेटर नळी सह रिक्षात भरण्यासाठी लावण्यात आलेले ओझरची नळी असे चार हजार रुपये किमतीचे दोन घरगुती गॅस सिलेंडर असा एकूण 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अशोक ठाकूर यांच्या फिर्यादीवरून अनवर भीस्ती याच्याविरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास किशोर निकुंभ करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.