पारोळा येथे वृध्दास अज्ञात व्यक्तीकडून मारहाण

0

 

पारोळा लोकशाही न्यूज नेटवर्क
पारोळा येथील म्हसवे शिवारात कासोदा रस्त्यालगत एका ६५ वर्षीय वृद्धास काठी,दगड,चाकूने हल्ला करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जबर मारहाण करण्यात आली.याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा शहरालगतच्या म्हसवे शिवारात शरद दगडु मोरे वय ६५ रा, पारोळा ह,मु, नाशिक यांना मंगळवारच्या रात्री ९,३० च्या सुमारास कासोदा रस्त्यालगत मोकळ्या जागेत कोणीतरी इसमाने काठी व दगड व चाकूने मारून टाकण्याच्या उद्देशाने जबर मारहाण केली.  या मारहाणीत सदर व्यक्ती ला गंभीर दुखापत झाली यावेळी सतीश रतीलाल चौधरी हे शेतात रस्त्याने जात असताना शरद मोरे हे त्यांना रक्त बंबाळ अवस्थेत रस्त्यावर आढळल्याने त्यांनी त्यांना पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले तेथून पुढील उपाचार्थ धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे याप्रकरणी सुभाष श्रीपाद चौधरी रा पारोळा यांनी मारहाण केल्याच्या आरोपावरून संशयित म्हणून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.