पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण ; चौघांविरुद्ध गुन्हा

0

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क
कुटुंबियांसह भोजनासाठी आलेल्या पोलीस कर्मचार्‍यांला चौघांनी मारहाण केल्याची घटना शहरातील एका हॉटेलमध्ये घडली असून याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर एक जण पसार झाला . याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश पाटील रा. पोलीस वसाहत, जळगाव हे जिल्हापेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असून मंगळवारी २८ मार्च रोजी रात्री गणेश पाटील कुटुंबियांसोबत नवीन बसस्थानकजवळील हॉटेल रिगल येथे जेवणासाठी गेले होते. त्यांच्या बाजूच्या टेबलावर कृष्णा नरेंद्र पिंगळे (वय-२०) रा. रायसोनी नगर, भावेश अनिल चौधरी (वय-१९) रा. गणेशवाडी, मयंक राजेंद्र चौधरी (वय-२७) आणि गोपाल नवल असे चार जण बसले होते.

यावेळी चौघांपैकी एकाने पाण्याची बाटली मारून फेकली. त्यावरून गणेश पाटील हे चौघांना समजविण्यास गेले असता. चौघांनी गणेश पाटील यांच्याशी धक्काबुक्की करत जुन्या वादातून मारहाण करत म्हणाले की तू आम्हाला यापुर्वी अटक केली होती, आता तू एकटा सापडला आहे, तू काहीच करून शकत नाही अशी धमकी देवून यातील एकाने फायटरने तोंडावर मारहाण करून दुखापत केली.

यानंतर जिल्हापेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून कृष्णा पिंगळे, भावेश चौधरी आणि मयंत चौधरी यांना जागेवरच अटक केली तर गोपाल नवल हा फरार झाला आहे. फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.