लासूर आरोग्य केंद्राची रुग्णसेवा अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे खिळखिळी !

0

रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी ; अन्यथा टाळे ठोका आंदोलन

लासूर ता.चोपडा , लोकशाही न्युज नेटवर्क

तालुक्यातील तिसऱ्या क्रमांकाचे गाव असलेल्या लासुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांचा कमतरतेमुळे आरोग्य प्रशासनावर अतिरिक्त ताण पडत आहे.लासुर प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध ८ पदे रिक्त असून त्वरित पदभरती होणे गरजेचे आहे. लासूर गावाच्या लोकसंख्येच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा अभावामुळे गावाची आरोग्य यंत्रणा खीळखिळी होतांना दिसत आहे.

लासुर गावासह ६ उपकेंद्रांतर्गत परिसरातील १३ गाव यात चौगाव,चुंचाळे,मामलदे, मराठे,उत्तमनगर,सत्रासेंन, मोरचिडा,अमलवाडी,उमर्टी, गौऱ्यापाडा,कृष्णापुर,कर्जाणे आदी गावांसह ३ आदिवासी पाड्यांचा देखील समावेश आहे.एवढ्या गावांचा ‘लोड’ असतांना पुरेसे कर्मचारी नसल्याने नागरिकांनाही पुरेशी सेवा देण्यात प्रा.आ.केंद्र काही अंशी असमर्थ ठरत आहेत.

प्रा.आ.केंद्रात आरोग्य सहायिका १,आरोग्य सेविका ४,परिचर २,सफाई कामगार १ अशा एकूण ८ पदांकरिता कर्मचाऱ्यांचा अभाव आहे.
कर्मचाऱ्यांचा पदभरतीचा प्रश्न असतांनाच आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांसाठी रहिवासाकरीता असलेल्या शासकीय वसाहतीची दयनीय अवस्था झाली असून कर्मचाऱ्यांना येथे स्थायिक होणे शक्य नसल्याने रात्रपाळीस थांबता येत नाही.आरोग्य केंद्रास जोडलेल्या गावांचा व्याप पाहता कर्माचाऱ्यांनी तेथेच थांबणे अत्यंत आवश्यक असल्याने निर्लेखन झालेल्या वसाहतीची दुरुस्ती व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने प्रशासनावर अतिरिक्त ताण येत आहे पदभरती झाल्यास आरोग्य सेवा सुरळीत होईल”

– डॉ.नितीन अहिरे (वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र लासूर)

लासूर आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची वणवा असल्याने रुग्णांची हेळसांड होत असून त्वरित पदभरती व्हावी अन्यथा रुग्णालयास टाळे ठोकू

– कैलास बाविस्कर (रुग्णकल्याण समिती सदस्य)

रिक्त पदे पुढील प्रमाणे -आरोग्य सहाय्यिका – १आरोग्य सेविका – ४ परिचर – २ सफाई कामगार – १

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.