मनवेल ग्रामपंचायतीचा जे.सी.बी. फिरला पाण्याच्या जलकुंभावर…

0

 

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

मनवेल येथे २००६ साली जलस्वराज प्रकल्प अंतर्गत उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीला मनवेल ग्रामपंचायतने जे.सी.बी.मशीन द्वारे जमीनदोस्त केले आहे.

मनवेल येथे जि.प.च्या माध्यमातून जलस्वराज प्रकल्प योजना अंतर्गत २००६ मध्ये  पाण्याची टाकी व ट्युबवेल  मंजूर करण्यात आली होती. यामध्ये ट्युबवेलच्या पाण्याची पातळी खोल गेल्याने ती बंद पडली. तर पाण्याच्या टाकीचे बांधकाम निकृष्ट दर्जाने झाले. त्याचबरोबर टाकीत पाणी जास्त दिवस टिकु शकत नसे, आणि टाकी कोणत्याही क्षणी कोसळून जीवीत हानी होण्याची संभावना असल्यामुळे ती टाकी फक्त सतरा वर्षांपासून शोपीस होती.

दरम्यान मनवेल ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जे.सी.बी. च्या सहाय्याने पाण्याची टाकी जमीन दोस्त केल्याने तर्कवितर्क चर्चला जात आहे. ग्रामपंचायतीने मासिक सभेत टाकी पाडण्याचा ठराव केला असला तरी प्रशासनाने टाकी पाडण्याची परवानगी दिली आहे का? असे अनेक प्रशन गावकरी उपस्थित करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.