जळगावातील मनपाच्या व्यापारी संकुलातील ८ गाळे सील

0

जळगाव : शहरातील नवीन बी. जे. मार्केट व गोलाणी मार्केटमधील आठ गाळे महापालिकेच्या – पथकाने सील केले असून हे गाळे महापालिकेने ताब्यात घेतले आहे.

शहरातील  मार्केट मधील गाळेधारकांकडे कोट्यांवधी रूपयांची थकबाकी आहे. परंतु सदर गाळेधारकांना वारंवार आवाहनकरून देखील गाळेधारक थकबाकीचा भरणा करत नसल्यामुळे अशा गाळेधारकांचे गाळे सील करण्याची कारवाई महापालिकेच्या मार्केट वसुली विभागाकडून सुरु आहे. मंगळवारी शहरातील नवीन बी. जे. मार्केटमधील ५ तर, गोलाणी मार्केटमधील ३ असे एकुण ८ गाळे सील करण्यात आले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.