मनपा आयुक्तांना उच्च न्यायालयाने बजावले जामीनपात्र वॉरंट

0

जळगाव : उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेच्या सुनावणींना हजर न राहिल्याने जळगाव महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना जामीनपात्र वॉरंट बजाविण्यात आले आहे. दि.१४ फेब्रुवारी रोजी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यासह हजर राहण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने काढले आहेत.

महापालिकेत वडिलांच्या जागेवर अनुकंपावर नियुक्ती मिळावी म्हणून दुर्गादास सुनील सैंदाणे यांनी २०२१ मध्ये अर्ज केला होता. परंतु महापालिका प्रशासनाने तो अर्ज रद्द केल्यामुळे दुर्गादास सैंदाने यांनी अॅड. गिरीश नागोरी यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मनपा प्रशासनाविरूध्द याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर कामकाजासाठी खंडपीठाने महापालिका प्रशासनाला हजर दि. राहण्याची नोटीस दिली होती. परंतु मनपा प्रशासनाकडून कोणीच हजर न झाल्याने पुन्हा मनपा प्रशासनाला नोटीस देवून हजर राहण्याची नोटीस दिली होती. मात्र तरी देखील मनपा प्रशासनाकडून कोणी हजर न झाल्यामुळे त्या याचिकेवर सुनावणी घेता आली नाही. त्यामुळे न्यायमुर्ती रवींद्र घुगे व वाय. जी. खोब्रागडे यांच्या द्विपीठाने २४ जानेवारी रोजी आयुक्तांना जामीनपात्र वॉरंट काढले असून दि.१४ फेब्रुवारी रोजी बजावले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.