मणिपूर सामूहिक बलात्कार प्रकरणी सीबीआयने नोंदवला एफआयआर, तपास सुरू…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

मणिपूरमधील महिलांची नग्न परेड केल्याप्रकरणी सीबीआयने एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. केंद्र सरकारने या घटनेची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची चर्चा केली होती. ही घटना ४ मेची आहे. घटनेच्या दोन महिन्यांनंतर 19 जुलै रोजी या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी मणिपूर पोलिसांनी आतापर्यंत 8 आरोपींना अटक केली आहे.

हा व्हिडिओ बनवणाऱ्या आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे. आता या प्रकरणात सीबीआय मणिपूर पोलिसांच्या आतापर्यंतच्या निष्कर्षांचीही चौकशी करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीने हा व्हिडीओ शूट केला त्याचा मोबाईल फोनही फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

डीओपीटीची अधिसूचना जारी झाल्यानंतर सीबीआयने एफआयआर नोंदवला आहे. मणिपूरमध्ये दाखल झालेला एफआयआर आता सीबीआयने अधिकृतपणे पुन्हा नोंदवला आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

CBI ने IPC कलम 153A, 398, 427, 436, 448, 302, 354, 364, 326, 376, 34 IPC आणि 25 (1-C) A कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे सीबीआय हिंसाचाराच्या प्रकरणांचा तपास करत होती. त्यातही सीबीआयने अनेकांना ताब्यात घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.