अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, वाचा सविस्तर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

माझ्यासोबत चल, आपण लग्न करू. नकार दिला तर तुझ्या अंगावर ॲसिड टाकेन, अशी धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग (molestation) करणाऱ्या युवकास पीडित मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी पोलिसांनी युवकास अटक केली आहे. सलीम पिंजारी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, तो शहरातील १४ वर्षीय विद्यार्थीनीचा ती शाळेत ये-जा करतांना सतत पाठलाग करत असे. एकांत साधून प्रेमाची मागणी घालत होता.

गेल्या दोन दिवसांपूर्वी विद्यार्थिनीला एकांतात गाठत माझ्यासोबत चल, आपण लग्न करू, नाही तर तुझ्या अंगावर ॲसिड टाकेन, अशी धमकी देऊन संशयिताने लज्जास्पद वर्तन केले. त्या आधारे पोलिसांनी पॉस्को व ॲट्रॉसिटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करून सलीम पिंजारी यास अटक केली आहे. उपअधीक्षक धनंजय येरुळे, पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी मणिहार नाईक तपास करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.