माजी मंत्री माणिकराव गावित याचं निधन

0

 

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क:

तब्बल आठ वेळा खासदार म्हणून संसदेत निवडून आलेले लोकप्रिय नेते आणि माजी मंत्री माणिकराव गावित यांचं आज सकाळी निधन झालं आहे. नाशिकधील खासगी रुग्णाल्यात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या निधनाची माहिती डॉक्टरांनी दिली. उद्या नवापूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

माणिकराव गावित यांनी देशाचं गृहराज्य मंत्रिपदही भूषवलं होतं. तब्बल ८ वेळा नंदुरबार मतदारसंघात काँग्रेसचे खासदार, दोन वेळा केंद्रात राज्यमंत्री, लोकसभेचे हंगामी अध्यक्षपदही भूषवलं होतं. त्यांची मुलगी निर्मला गावित इगतपुरीच्या माजी आमदार ,तर मुलगा भरत गावित भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.