घरातून मांडूळ साप जप्त; एकास अटक

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

येथील यावल व रावेर वनविभागाच्या संयुक्त पथकाने केलेल्या कार्यवाहीत रोझोदा तालुका रावेर येथुन एकाच्या घरातुन मांडुळ जातीचे सर्प जप्त करण्यात आले असल्याची माहीती मिळाली आहे.

या संदर्भात वनविभागाच्या सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ८ सप्टेंबर रोजी मौजे रोझोदा तालुका रावेर येथे राहणारा देवेंद्र  गिरधर लिधुरे  यांच्या राहत्या घरातुन वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे दि. वा. पगार (वनसंरक्षक धुळे) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश हाडपे (उप वनसंरक्षक मावल) यांनी यावल पुर्व विभागाचे वनक्षेत्रपाल विक्रम पदमोर, रावेरचे वनक्षेत्रपाल बावणे, वनक्षेत्रपाल फिरते पथक आंनदा पाटील यांच्या पथकाने संयुक्तरित्या केलेल्या कार्यवाहीत मांडुळ (red ऽand boa) या जातीचे सर्प जप्त केले.

देवेन्द्र लिथुरे याच्या विरूद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ व वनजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा राखल करण्यात आला असुन, संशयीत आरोपीस अटक करण्यात आली आहे . या कार्यवाहीत रोझोदा पोलीस पाटील, रावेरचे वनपाल रवींद्र सोनवणे, फैजपुरचे वनपाल अतुल तायडे, पोलीस कर्मचारी सचिन तडवी, वनरक्षक संभाजी सुर्यवंशी, गोवर्धन डोंगरे, तुकाराम लवटे, सुपडू सपकाळे, कृष्णा शेळके, युवराज मराठे, राहुल बोंडल, अरूणा ढेपले, आयशा पिंजारी, सविता वाघ, वाहनचालक आनंद तेली, इमाम तडवी, सचिन पाटील, विनोद पाटील यांचा सहभाग होता.

Leave A Reply

Your email address will not be published.