रेल्वेने प्रवास करतांना जागरूक राहा !

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

रेल्वेचा प्रवास हा अत्यंत सुखकर समजला जातो. मात्र हा रेल्वे प्रवास करतांना प्रवाशांनी जागृत असणं गरजेचं आहे. जेणेकरून आपल्यासोबत काही दुर्घटना घडणार नाही. याच पाश्वभूमीवर अमळनेर रेल्वे स्थानकावर जागरूकता अभियान राबविण्यात आले. यावेळी रेल्वेस्थानकावर जमलेल्या सर्व प्रवाशांना जनजागृतीपर तयार करण्यात आलेल्या बॅनरच्या माध्यमातून ASI कुलभूषण सिंह चौहान यांनी माहिती दिली.

मानवी तस्करी

मानवी तस्करी ही देशातील सर्वात मोठी समस्या आहे. मानवी तस्करीसाठी वाहतुकीचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भारतीय रेल्वेचा वापर केला जातो. अनेकदा लैंगिक शोषण, वेश्याव्यवसाय, सक्तीचे मजुरी, सक्तीचे विवाह, घरगुती सक्तीचे मजुरी, दत्तक घेणे, भीक मागणे, अवयव प्रत्यारोपण, ड्रग्ज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवणे यासाठी लहान मुले, महिला यांची मोठ्या प्रमाणावर रेल्वेतून तस्करी केली जातो. म्हणून रेल्वेने प्रवास करतांना  पालकांनी लहान मुलांची काळजी घेणं आवश्यक आहे.

जहर खुरानी

तसेच जहर खुरानी हा देखील प्रकार सध्या वाढतांना दिसत आहे.  प्रवास करतांना आपला विश्वास संपादन करून नशेची बिस्किटे किंवा इतर अन्नपदार्थ देऊन बेशुद्ध केले जाते. त्यानंतर आपल्याकडील मौल्यवान वस्तू, दागिने, पैसे चोरले जातात. म्हणून रेल्वे प्रवासात अनोळखी व्यक्तीने दिलेले बिस्कीट, चॉकलेट खाऊ नये.

चेन पुलिंग

भारतीय रेल्वेने चेन पुलिंगची सुविधा दिलेली आहे. मात्र त्याचे देखील नियम आहेत. धावत्या रेल्वेत कधी दरोडा पडणे, आग लागणे किंवा महिलांवर अत्याचाराच्या घटना घडणे, याशिवाय आणीबाणी स्थितीदर्शक काही प्रकार घडला तर एक्स्प्रेस, मेल, लोकलमध्ये अलार्म चेन पुलिंग (एसीपी)ची सुविधा वा पर्याय प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र आपत्कालीन घटना नसतानाही काही प्रवाशांची गाडी सुटली असता गाडीतील त्यांचे सहकारी, नातलग चेन ओढतात किंवा एखाद्या स्थानकावर उतरायचे असेल व तिथे संबंधित गाडीला थांबा नसेल तरीदेखील त्या रेल्वे स्थानकाच्या आसपास चेन ओढली जाते. असे प्रकार घडतात. मात्र विनाकारण साखळी ओढणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.