मनपा मध्ये काँक्रिट रस्ते गुणवत्ता नियंत्रण मार्गदर्शन सत्र संपन्न…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

जळगाव मनपा व बांगर सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने काँक्रिट रस्ते बनविताना गुणवत्ता नियंत्रण कसे करावे याबाबत मार्गदर्शन सत्र दिनांक 3.11.2023 रोजी मनपा सभागृहात घेण्यात आले. या सत्रात शासकीय तंत्रनिकेतन चे प्राचार्य डॉ पराग पाटील यांनी काँक्रिट रस्ते बनविताना काय काळजी घ्यावी, कुठल्या बाबी तपासल्या पाहिजे याबाबत सर्व मनपा अभियंते आणि कंत्राटदार यांना मार्गदर्शन केले.तसेच अभियंते व कंत्राटदार यांच्या शंकांचे निरसन केले.

मनपा मार्फत होणाऱ्या काँक्रिट रस्त्यांची गुणवत्ता चांगल्या दर्जाची राहावी याबाबत वेगवेगळे प्रयत्न केले जात असून त्याचाच भाग म्हणून हे सत्र आयोजित केले गेले. तसेच काँक्रिट रस्ते चांगले होण्यासाठी उत्तम दर्जाचे मटेरियल वापरले पाहिजे याबाबत बांगर सिमेंट चे महाराष्ट्र तांत्रिक हेड प्रबोध देशपांडे(महाराष्ट्र टेक्निकल हेड) यांनीदेखील मार्गदर्शन केले .

याप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ विद्या गायकवाड, सहा.आयुक्त गणेश चाटे, सहा.आयुक्त अश्विनी गायकवाड, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, प्र.सह आयुक्त उदय पाटील, बांगार सिमेंट चे विशाल जैन(खान्देश टेक्निकल हेड), मिथीलेश गजभिये (जळगांव टेक्निकल), निलेश इंगळे (सेल्स मॅनेजर), रवींद्र शर्मा, सर्व मनपा अभियंते व कंत्राटदार उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.