मनपाचे ९८१.४७ कोटीचे अंदाजपत्रक जाहीर

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

जळगाव शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा वेग आणि नागरीकरण विचारात घेऊन नागरी सुविधांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. या दृष्टीकोनातून जळगाव शहरासाठी सण २०२४-२५ चे सुधारित अंदाजपत्रक सादर करण्यात आले. अंदाज पत्रकानुसार महानगरपालिकेचे महसूल उत्पन्न व दायित्व पाहता आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देणे हे मोठे आव्हान असणार आहे. काल याबाबत महानगरपालिकेत बैठक झाली. सुमारे ९८१.४७ कोटी रुपयांची तरतूद या अंदाज पत्रकात करण्यात आली आहे.

आज झालेल्या बैठकीत सन 2024 25 च्या आगामी आर्थिक वर्षात जळगाव शहरातील सौंदर्यीकरण, वाहतूक व्यवस्थासाठी नवीन सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे, शहरातील वाढीव हद्दीत दिवाबत्ती व्यवस्था कार्यान्वित करणे, प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने ट्री बँक उपक्रम राबवणे, घनकचरा व्यवस्थापन व मलणित्सारण योजना सुरळीत करणे, अमृत योजनेअंतर्गत 24 तास सुरळीत पाणीपुरवठा करणे, सर्व तक्रारी ऑनलाइन नोंदवणे व त्यांचे तातडीने निराकरण करणे आणि डिजिटलायझेशनच्या माध्यमातून सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणे यासाठी शासन प्रयत्नशील असणार आहे. यासंदर्भाचे परिपत्रक आज झालेल्या बैठकीत नंतर सादर करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.