माणूस खातो चक्क गुरांचा चारा…! ( व्हिडीओ )

0

 

उत्तर प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क;

कुणाचं काय तर कुणाचं काय… ही म्हण प्रत्येकाला ठाऊक असेलच. पण एका व्हायरल झालेल्या व्हिडीओला बघून आणि खासकरून त्याला एका युझर ने दिलेल्या कॅप्शनवर तुम्ही नक्कीच चक्रावून जाल.

बुधिराम यांचा व्हिडिओ @mahansharma6  या हँडलवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला. आणि त्यांनी त्यात व्हिडीओ शेयर करतांना लिहिले कि,

#ViralVideo यूपी के महराजगंज जिले में नागपंचमी पर अजीबोगरीब मामला, ग्रामीण के सिर पर हुआ भैंसासुर सवार, खाने लगा घास-फूस, बड़ी संख्या में दर्शन को पहुंचे लोग, लिया सभी ने आशीर्वाद #UttarPradesh

या व्हिडिओत एक टोपली दिसत असून, यात चारा आणि पाणी टाकलेलं दिसतं. बुधिराम या टोपलीत तोंड घालून चारा खाताना व पाणी पिताना दिसत आहेत. विशेष म्हणजे आजुबाजूचे लोक त्यांना केळी व गवत खाऊ घालताना दिसत आहेत.आणि त्यांचा आशीर्वाद घेत आहेत. काही लोकांनी या व्हिडिओखाली तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून ही व्यक्ती माणूस नव्हे पशु असल्याचं एका युजरनं म्हटलं आहे.

दरम्यान, दरदिवशी सोशल मीडिया असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात मनोरंजनात्मक व्हिडिओला नेटिझन्सची चांगलीच पसंतीही मिळते. अनेक जणांच्या मते, बुधिराम यांची कृती अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी असू शकते. पण हा प्रकार पाहून लोकांचं चांगलंच मनोरंजन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.