तरूणाचा मेहरूण तलावात बुडून मृत्यू

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील मेहरुण तलावामध्ये तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवार ८ ऑगस्ट रोजी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी नोंद घेतली असून अकस्मात मृत्यू नोंद करण्याचे काम सुरू होते.

नाना सुरेश सोनवणे (वय ३२, रा.इच्छादेवी नगर) असे मयत तरूणाचे नाव आहे.  नाना सुरेश सोनवणे हा सोमवारी ८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास  मेहरूण तलाव येथे गेला होता. काही वेळानंतर तो तेथे बुडून मृत्यू पावल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान, त्याने आत्महत्या केली किंवा पाण्यात पाय घसरून पाडला याची कोणतीही माहिती मिळाली नाही.

पोलीसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना केला. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राची सुरतवाला यांनी त्यास मयत घोषित केले. यावेळी नातेवाईकांची गर्दी करत मोठाआक्रोश केला.

मयत नाना सोनवणे यास आई, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. तो लक्झरी बस स्टॉप वर वाहकाचे काम करत होता. त्याच्या वडिलांचे पाच वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.