मोठी कारवाई.. दोन आरोपीसह १ लाखाचा मुद्देमाल जप्त

0

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

येथील बोदवड पिंपळगाव देवी रस्त्यावर अवैधरीत्या वाहनाद्वारे दारूची वाहतूक केली जात असल्याची गोपनिय माहिती राज्य उत्पादन शुल्क  अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यावरून सदर सापळा रचित दोन आरोपीसह एक लाख १७ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दि.१० जुलै रोजी आषाढी एकादशी व कोरडा दिवसाच्या अनुषंगाने बोदवड ते पिंपळगांव देवी रोडने अवैधरित्या देशी विदेशी दारुची वाहतुक होते अशी गुप्त व खात्रीलायक बातमी मिळाल्यावरुन राज्य उत्पादन शुल्क, बुलडाणा विभागाचे अधिक्षक भाग्यश्री पं. जाधव यांचे मार्गदर्शनाखाली मलकापुर येथील प्रकाश व्ही मुंगडे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क तसेच जवान  प्रदीप शेषराव देशमुख व दोन पंचासह बोदवड ते पिंपळगांव देवी रोडवर पाळत ठेवुन छापा टाकला.

सुनिल मनोहर महाले (वय ४०, रा. लिहा ता. मोताळा जि.बुलडाणा), गणेश छगन कांडेलकर (वय ४०, रा. लिहा ता. मोताळा जि. बुलडाणा) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांचे स्वतःच्या मालकीचे टीव्हीएस स्टार सिटी मोटर सायकलने अवैधरित्या विनापास परवाना देशी व विदेशी दारुची वाहतुक करतांना मिळून आले. त्यांचे ताब्यातुन एक स्टार सिटी  मोटर सायकल व १८० मि.ली.क्ष.च्या २४० देशी दारुच्या सिलबंद बाटल्या तसेच ९० मि.ली.क्ष.च्या ३०० प्लॉस्टिकच्या सिलबंद बाटल्या व विदेशी दारुच्या १८० मि.ली.क्ष . च्या ९६ मॅकडॉल नं .१ च्या व इम्पीरीयल ब्लु या ब्राण्डच्या सिलबंद बाटल्या असा एकुण १,१७,३३० / -रु . दारुबंदी गुन्हयाचा मुद्देमाल मिळून आला.

आरोपी विरुध्द म. दा. का. १९४९ चे कलम ६५ अ.ई व ८३ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास प्रकाश व्हि मुंगडे दुय्यम निरीक्षक मलकापुर हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.