Wednesday, September 28, 2022

बस मध्ये बसवुन दिल्यावरही सुन माहेरी पोहचली नसल्याने सासऱ्याची पो.स्टे.ला तक्रार

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

मलकापुर:- तालुक्यातील धरणगाव येथील मधुकर निवृत्ती पाटील वय 62 यांनी त्यांची सुन नामे रोहिणी दिनकर पाटील वय 22 ,नात श्रावणी दिनकर पाटील वय 03 वर्षं रा. धरणगाव ता. मलकापुर यांना दिनांक 17 एप्रिल रविवार रोजी दुपारी दोन वाजता माहेरी शिरपूर जैन ता. मालेगाव जि. वाशिम येथे जाण्यासाठी इंदौर ते नांदेड जाणाऱ्या बसमध्ये मलकापूर येथील बसस्थानकावरून बसवुन दिले.

- Advertisement -

- Advertisement -

सुन रोहिणी माहेरी पोहचली किंवा कसे याबाबत सुनेला पती दिनकर याने फोन केला असता सुनेचा फोन बंद आला त्यानंतर तिचे वडीलांना फोन करून विचारले असता त्यांची मुलगी रोहिणी व नात श्रावणी शिरपूर जैन येथे पोहोचलेच नाही म्हणून कळविले सर्वत्र शोध घेतला असता मिळून आली नाही.

या बाबतची फिर्याद सासरे मधुकर निवृत्ती पाटील वय 62 रा.धरणगांव यांनी पो.स्टे.मलकापूर शहर येथे दि.18एप्रिल रोजी दिली अश्या फिर्यादीवरून पोलिसांनी मीसिंग क्रं.15/22 दाखल करण्यात आला असुन सौ. रोहिणी पाटील यांचे वर्णन वय 22 वर्ष,रंग गोरा,उंची 5 फुट, बांधा-सडपातळ,केस काळे, पोशाख-पांढऱ्या रंगाचा कुर्ता व हिरव्या रंगाची सलवार, पायामध्ये चप्पल, गळ्यामध्ये मंगळसुत्र,

नात श्रावणी वय 03 वर्षं, उंची 02 फुट, चेहरा गोल, रंग गोरा, पोषाख पांढऱ्या रंगाचा फ्रॉक, काळ्या रंगाची फुलपॅन्ट, डोक्यामध्ये टोपी,पायात चप्पल अश्या वर्णनाची व्यक्ती मिळुन आल्यास तपास अधिकारी पो.ना.अमोल सुखदेव शेले ब.नं.967 मो.9588440322 किंवा मलकापुर शहर पोलीस स्टेशन फो.नं.07267 222018 या क्रमांकावर संपर्क साधावा.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या