मालदीवच्या तणावानंतर टाटा समूहाचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

टाटा समूह लक्षद्वीप या भारतीय केंद्रशासित प्रदेशातील सुहेली आणि कदम या दोन सुंदर बेटांवर ताज ब्रँडेड रिसॉर्ट बांधणार आहे. इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड ने अलीकडेच या दोन बेटांवर ताज ब्रँडचे दोन रिसॉर्ट बांधण्यासाठी करार केले आहेत. हे रिसॉर्ट २०२६ मध्ये सुरु होतील. हे दोन्ही रिसॉर्ट स्थानिक संस्कृती आणि पर्यावरणाला धक्का न लावता बांधले जातील. सुहेली आणि कदमत बेटे त्यांच्या निळसर पाण्यासाठी, पांढर्‍या वाळूच्या किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहेत.

राजकीय तणावादरम्यान धोरणात्मक पाऊल

लक्षद्वीपला भारतीय पार्टकांसाठी एक प्रमुख ठिकाणी म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीने हे धोरणात्मक पाऊल उचलले आहे. विशेषतः भारत आणि मालदीवमधील संबंध तणावपूर्ण असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली. त्यांच्या लक्षद्वीप भेटीच्या आवाहनामुळे मालदीवच्या काही मंत्र्यांनी भारताविरोधात वक्तव्ये केली. यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

ताज सुहेलीमध्ये ६० बीच व्हील आणि ५० वॉटर व्हिलासह ११० खोल्या असतील. तर ताज कदमात ११० खोल्या असतील त्यात ७५ बीच व्हीला आणि ३५ वॉटर व्हिला असतील. लक्षद्वीप व्यतिरिक्त, IHCL ने उत्तर प्रदेशातील दुधवा येथील सिलेक्शन हॉटेल जागीर मनोरसह पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.