पोलीस दलातील महिलांवर झालेल्या अत्याचार प्रकारणी मोठी माहिती समोर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबई पोलीस दलातील मोटार परिवहन विभागातील महिला पोलिसांचा लैंगिक छळ होत असल्याचा उल्लेख असलेलं बनावट लेटर सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. लेटर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी अखेर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नागपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात कलम ४६५, ४६८, ४६९, ४७१, ५००, ५०९ भादवी सह पोलीस अप्रतीची भावना चेतावणे कायदा १९२२ कलम ०३ सह आयटी अॅक्ट कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिला पोलीस शिपाईने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास नागपाडा पोलीस करत आहे.

शुक्रवारी हे पात्र व्हायरल झालं. यामध्ये मुंबई पोलिसांच्या मोटार परिवहन विभागातील ८ महिला पालिसांनी त्यांच्या वरिष्ठ पोलिसांकडून लैंगिक छळ होत असल्याची तक्रार केल्याचा उल्लेख होता. सदर पत्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस आयुक्त, प्रशासन विभागाचे पोलीस सहआयुक्त, गुन्हे विभागाचे पोलीस सहआयुक्त आणि वाहतूक विभागाचे पोलीस सहआयुक्त, नागपाडा येथील मोटार परिवहन विभागाचे पोलीस उपायुक्त या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना लिहिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.