हुश्श : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटला ; उद्या होणार नावांची घोषणा

0

मुंबई ;-लोकसभा निवडणूक जुळवलं येऊन ठेपलेली असताना जागा वाटपाच्या मुद्द्यांवरून महाविकास आघाडीच्या काही नावाची घोषणा उद्या गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर होणार असून संयुक्तरिया परिषद घेऊन जागा वाटप आणि उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार आहे.

उद्या सकाळी ११ वाजता मविआकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या पत्रकार परिषेदला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उपस्थित राहणार असून त्यांच्याकडून जागावाटपाबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

जागावाटपावरून महाविकास आघाडीत मोठा तिढा निर्माण झाला होता. मविआतील तीन प्रमुख पक्षांची वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा सुरू होती. मात्र जागावाटप निश्चित न झाल्याने प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. जागावाटपाचा हा तिढा अखेर सुटला असल्याचं सांगण्यात येत असून उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीतील कोणता पक्ष कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार, याबाबतची घोषणा केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.