क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग, इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त 11 एप्रिल, 2023 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती सहायक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

सकाळी 8.00 वाजता जी. एस. ग्रांऊड येथून महात्मा फुले मार्केट, शास्त्री टॉवर चौक, जळगाव पर्यंत समता रॅलीचे आयोजन करण्यात आले. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 8.30 वाजता शहरातील महात्मा फुले मार्केट येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या स्मारकास माल्यार्पण व पुष्पहार अर्पणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महाबळ रोड, जळगांव येथे 11.00 वाजता प्रा. संजीव सोनवणे यांचे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांचे प्रेरणादायी जीवनकार्य या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.

शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे. असे आवाहन सहायक आयुक्त पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.