महाशिवपुराण चैतन्याचे अमूर्त रूप : मोरदे महाराज

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव : मानवी स्वभावाला चैतन्याच्या सर्वोच्च पातळीवर नेण्यासाठीचे उत्तम साधन म्हणजे शिवपुराण. शिवपुराणमध्ये विविध रूपे, अवतार, ज्योतिर्लिंग, विविध भक्तांची माहिती आणि भक्तीचे अनन्यसाधारण स्वरूप विशद केलेले आहे.

भगवान शंकराला महाशिवपुराणाच्या माध्यमातून अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेता येते, असे मार्गदर्शन हभप देवदत्त मोरदे महाराज यांनी केले.

शहरातील गणेशवाडी भागामध्ये श्रीदत्त मंदिर परिसरात माजी महिला व बालकल्याण सभापती मंगला चौधरी यांच्यातर्फे संगीतमय भव्यदिव्य श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. कथेच्या दुसऱ्या दिवशी हभप देवदत्त मोरदे महाराज यांनी कथा सुश्राव्य केली.

ते म्हणाले, की महाशिवपुराणमध्ये शिवभक्ती आणि शिवमहिमेची सविस्तर माहिती मिळते. भगवान शंकर हे सर्व भक्तांना प्रसन्न होणारे आणि मनाप्रमाणे फळ देणारी देवता मानली जाते. भगवान शिव सदैव लोकहितकारी आहेत. महादेवाच्या पूजनाने सर्व यज्ञांचे फळ मिळते. जे फक्त महादेवाची आराधना करतात त्यांच्यावर महादेव कायम प्रसन्न असतात.

कथेनंतर भगवान शंकराची महाआरती करण्यात आली. महाआरती डॉ. राजेंद्र चौधरी, डॉ. गौरव महाजन, डॉ. भूषण जगताप, शेखर कुलकर्णी, शंभू सोनवणे, राकेश सोनी, सुधीर चौधरी, चेतन शर्मा, बापू पाटील, शिवाजी गवारे यांच्या हस्ते करण्यात आली. रविवारी (ता. १५) श्री महाशिवपुराण कथेमध्ये भगवान शंकराच्या अगाध लीला विशद होणार आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.