MPSC परीक्षेची तारीख जाहीर; 161 पदांसाठी 37 जिल्हा केंद्रांवर नियोजन

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील एकूण 161 पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत येत्या 21 ऑगस्ट रोजी राज्य सेवा पूर्वपरीक्षा घेण्यात येणार आहे. राज्यभरातील 37 जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येईल.

या पदांची होणार भरती

1) सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेख सेवा (एकूण 9 पदे)
2) मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद (एकूण 22 पदे)
3) बाल विकास प्रकल्प अधिकारी व तत्सम पदे (एकूण 28 पदे)
4) सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, (एकूण 2 पदे)
5) उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (एकूण 3 पदे)
6) कक्ष अधिकारी (एकूण 5 पदे) 7) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एकूण 4 पदे)
8) निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था तसेच तत्सम पदे (एकूण 88 पदे)

पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता मुख्य परीक्षा 21, 22 व 23 जानेवारी किंवा त्यानंतर आयोजित होण्याची शक्यता आहे.

या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी 1 जून 2022 पर्यंत रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी ओपन गटासाठी 544 रुपये तर मागासवर्गीय गटासाठी 344 रुपये शुल्क आहे. तसेच, अर्ज सादर करतानाच जिल्हा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे. नंतर जिल्हा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही कारणास्तव मान्य करता येणार नाही, असे राज्य लोकसेवा आयोगातर्फे सांगण्यात आले आहे. अर्ज सादर केल्यानंतर परीक्षेच्या साधारण सात दिवस अगोदर हॉल तिकिट मिळणार आहे.

ही परीक्षा 3 टप्प्यांमध्ये होणार आहे. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी आयोगाच्या https://mpsconline.gov.in/candidate या संकेतस्थळाला भेट द्यावी.

 

Leave A Reply

Your email address will not be published.