राज्यपालांच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात युक्तिवाद सुरु

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झाली आहे. थोड्याच वेळात मोठा निर्णय येण्याची शक्यता आहे.

अभिषेक मनू सिंघवी शिवसेनेचे नेते सुनील प्रभू यांची बाजू मांडणार आहेत. तर नीरज कौल एकनाथ शिंदे यांची बाजू मांडणार आहेत. तर महाधिवक्ता तुषार मेहता राज्यपालांची बाजू मांडणार आहेत.

बहुमत चाचणीला 30 जूनला सामोरे जा, असा आदेश राज्यपालांनी 29 जूनला दिला आहे. दोन मंत्र्यांना कोरोना झाला आहे. एक आमदार परदेशात आहेत. ही खूप वेगाने बहुमत चाचणी होत आहे. मात्र बहुमत चाचणीला पूर्ण आमदार उपस्थित हवेत, असे शिवसेनेचे नेते सुनील प्रभू यांची बाजू मांडणारे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच 39 बंडखोर आमदारांचा पात्रतेचा मुद्दाही कोर्टात प्रलंबित आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.