अमावस्येला अघोरीपणा.. दाराजवळ जादूटोण्याचा प्रकार, ६ संशयितांवर गुन्हा दाखल

0

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राला अजूनही अंधश्रद्धेच्या रोगाने ग्रासलेले आहे. आजही अंधश्रद्धेमुळे अनेकांचे बळी जात आहेत. जळगावात देखील अंधश्रद्धेची एक घटना उघडकीस आलीय.

जळगाव शहरातील शिवाजी नगर दालफड येथे रहिवासी असलेले अ‍ॅड. केदार भुसारी यांच्या घराच्या दाराजवळ प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला मानवी केस व हळद कुंकू, “अंजली” असे लिहिलेली, पिवळ्या रंगाची फुली करुन ठिकठिकाणी सुया टोचलेली काळी बाहुली टाकण्याचा प्रकार कुणीतरी करत आहे. याप्रकरणी सौ. अंजली केदार भुसारी यांनी जळगाव शहर पोलिस स्टेशनला सहा संशयितांविरुद्ध अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

सौ. अंजली भुसारी यांचे पती अ‍ॅड. केदार भुसारी यांच्या बाजूने वडिलोपार्जीत जागेच्या दाव्याचा निकाल लागला आहे. सदर दावा सौ. अंजली भुसारी यांच्या सासऱ्यांनी केला होता. आपल्याला घाबरवण्यासाठी व आपल्या पतीच्या जीवाचे बरेवाईट होण्याच्या उद्देशाने सहा जणांकडून हा प्रकार केला जात असल्याचा संशय सौ. अंजली भुसारी यांनी फिर्यादीच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

दरम्यान  प्रकाश रामेश्वर व्यास व त्यांची पत्नी ललिता प्रकाश व्यास, सुशिला गोपाळ पंडीत, विद्या गोपाळ पुरोहीत, गौरीलाल रुपचंद पुरोहीत सर्व रा. शिवाजीनगर दाळफड जळगाव अशी संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी स.पो.नि. संदीप परदेशी पुढील तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.