Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»पावसामुळे खड्डेमय रस्ते.. मनसे करणार खळखट्याक आंदोलन
    राजकारण

    पावसामुळे खड्डेमय रस्ते.. मनसे करणार खळखट्याक आंदोलन

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 14, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    वाहनचालकांनो सावधान ! जळगाव शहरातील नॅशनल हायवे क्रमांक 6 या रस्त्यांवर खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन कोंडी होत आहे. तसेच काही ठिकाणी अपघात देखील होत आहेत. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेत काही ठिकाणचे खड्डे बुजविले. मात्र खड्डे मोठ्या संख्येने असल्याने पोलिसांची अडचण झाली. त्यामुळे तत्काळ खड्डे बुजवून रस्ता दुरुस्ती करण्यात यावी, अशा आशयाचे पत्र तसेच जळगाव जागा यात्रा आणि निवेदन देऊन प्रशासनाकडे पाठपुरावा सादर करण्यात आलेला आहे. त्यानुसार तात्पुरती उपाययोजना म्हणून काही ठिकाणी खडी, मुरूम टाकण्यात आला आहे. मात्र, अनेक रस्त्यांवर अद्याप खड्डे आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव यांनी केले आहे.

    आयुक्तालयांतर्गत द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग तसेच जिल्हा मार्ग देखील आहेत. पावसामुळे या रस्त्यांवर खड्डे झाले आहेत. त्याबाबत मनसे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका, पीएमआरडीए, एमआयडीसी, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह विविध आस्थापनांकडे निवेदन दिलेले आहे. संबंधित आस्थापनेच्या अखत्यारित येणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी निवेदन देण्यात आले आहे. यापूर्वीही मनसे चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वारंवार आंदोलन करून सुद्धा रस्ते दुरुस्ती, रुंदीकरण,साईडपट्ट्यां ची दुरवस्था प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. मात्र, तरीही प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

    परंतु आता मनसे कोणताही निवेदन देणार नाही चार दिवसाच्या खड्डे नाही बुजवले तर मनसे, मनसे स्टाईलने उत्तर देणार आहे हे लक्षात ठेवा असे मनसे शहर उपाध्यक्ष आशिष सपकाळे यांनी लोकशाहीशी  बोलताना सांगितले.

    jalgaon Maharashtra Navnirman Sena
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026

    राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक

    August 11, 2026

    राहुल गांधी यांनी चर्चेपासून पळू नये : भाजपची मागणी

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif