ब्रेकिंग; बिहारमध्ये ३४ मुले असलेली बोट उलटली… १८ अजूनही बेपत्ता…

0

 

मुझफ्फरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये बागमती नदीत बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 34 मुलांना घेऊन जाणारी बोट नदीत उलटली. त्यापैकी 18 अजूनही बेपत्ता असल्याची माहिती आहे. तर आतापर्यंत अनेक मुलांना वाचवण्यात यश आले आहे. मुले बोटीने शाळेत जात होती. बागमती नदीच्या मधुपूर पट्टी घाटाजवळ बोट उलटली.मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पत्रकारांना सांगितले की, जिल्हा दंडाधिकार्‍यांसह वरिष्ठ जिल्हा अधिकार्‍यांना अपघातस्थळी जाण्याचे निर्देश देण्यात आले असून मुलांच्या कुटुंबीयांना मदत केली जाईल असे सांगितले.

सीएम नितीश कुमार म्हणाले, “बचाव कार्य सुरू आहे… मी संबंधित जिल्हा दंडाधिकार्‍यांना या प्रकरणात तात्काळ लक्ष घालण्यास सांगितले आहे. राज्य सरकार पीडित कुटुंबांना सर्व मदत करेल.” राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे पथकही मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.