ब्रेकिंग..विधानसभेत कर्नाटकविरोधात ठराव मंजूर

0

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद गेल्या काही दिवसांपासून पेटला आहे. याबाबत आज विधानसभेत कर्नाटक विरोधातील (Maharashtra Karnataka Border) ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी कर्नाटक विरोधातील ठराव मांडला. यानंतर एकमताने हा ठराव मंजुर करण्यात आला.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

कर्नाटक सीमाप्रश्नावर ठरावाचं वाचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सुरु आहे. यावेळी शिंदे यांनी खटला लढण्यासाठी कायदेतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती दिली. तसेच कर्नाटक सरकारच्या वर्तनाचा निषेध, महाराष्ट्रातली वाहनांवर हल्ले झाले, सीमेवरची ८६५ गावं महाराष्ट्रात सामील करण्यासाठी प्रयत्न करणार. सीमावादाला चीथावणी देण्याचा जाणीवपूर्वीक काम कर्नााटक सरकारने केलं. सीमाभागातील मराठी माणसांच्या पाठीशी एकजुटीने उभे राहू. सीमाप्रश्नी बलिदान देणाऱ्या कुटुंबाला अर्थिक मदतीची घोषणा यावेळी करण्यात आली. कुटुूंबाला दरमहा २० हजाराची मदत जाहिर केली. तसेच सांस्कृतीक शैक्षणिक मदत जाहिर करण्यात आली. यासोबत सीमावरती भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक जागा राखून ठेवणार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.