जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर च्या वतीने रेल्वे स्टेशन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा), भाजपा जिल्हाध्यक्षा उज्वला बेंडाळे यांच्या हस्ते प्रतिमापूजन व माल्यार्पण करण्यात आले.
याप्रसंगी लोकसभा प्रभारी जिल्हा सरचिटणीस डॉ राधेशाम चौधरी, प्रदेश चिटणीस महिला मोर्चा रेखा वर्मा, जिल्हा पदाधिकारी महेश जोशी, राजू मराठे, सुनील खडके, कार्यालय मंत्री प्रकाश पंडित, जिला अध्यक्ष महिला मोर्चा दीप्ती चिरमाडे, धीरज वर्मा, लता बाविस्कर, यु.मो अध्यक्ष आनंद सपकाळे, प्रल्हाद सोनवणे, क्षितिज भालेराव, संगीता पाटील, नंदिनी दर्जी, चित्रा मालपाणी उपस्थित होते.