महाडीबीटी पोर्टलवर पीक प्रात्यक्षिके या घटकासाठी शेतकऱ्याचे अर्ज स्विकरण्यास सुरवात

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
सन 2023-24 मध्ये राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत महाराष्ट्र मिलेट मिशन व राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके अंतर्गत खरीप हंगामामध्ये पीक प्रात्यक्षिके या बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज स्विकारणे सुरू झालेले असून इच्छूक लाभार्थ्यां शेतकऱ्यांनी आपले सरकार महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करावी.

https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Scheme याऑनलाईन लिंक व्दारे लॉगीन करुन अर्ज करावा. राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत महाराष्ट्र मिलेट मिशन व राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके, कार्यक्रम खालील पिकांसाठी राबविण्यात येत असून त्याअंतर्गत 1) कडधान्य- तूर, मूग व उडीद 2)भरडधान्य (मका) बाजरी पीक

प्रात्यक्षिके –

पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला एक एकर मर्यादित निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. बियाणे, जैविक खते, सुक्ष्ममूलद्रव्ये, भूसुधारके व पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी शेतकऱ्याला एक एकरच्या मर्यादित एका पिकासाठी संबंधीत पिकाच्या प्रकारानुसार रु. 2हजार ते 4हजार – प्रती एकर मर्यादित अनुदान अदा करण्यात येणार आहे. यासाठी कृषि विद्यापीठांचे शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने व मार्गदर्शनाखाली जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात आले असून संपूर्ण पॅकेजचा वापर करणे अनिवार्य आहे.शेतकऱ्यांची निवड ही ऑनलाईन लॉटरी पध्दतीने करण्यात येणार आहे.

एकाच गावातील 25 शेतक-यांनी 10 हेक्टर क्षेत्रावर समूहाने नोंदणी केल्यावरच ऑनलाईन सोडतीमध्ये सदरील गावाचे नाव समाविष्ट होणार असल्याने एकाच गावातील समूहाने / गटाने नोंदणी करुन या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी यांचेशी करावा.असे आवाहन अधिक्षक जिल्हा कृषि अधिकारी,जळगाव संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.