पाचोरा बाजार समिती सभापती निवडणुकीचा तिढा

0

लोकशाही, संपादकीय लेख

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील बारा बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणूक पार पडल्या. बारा पैकी जामनेर, भुसावळ, यावल, चोपडा, धरणगाव आणि चाळीसगाव बाजार समितीमध्ये शिंदे फडणवीस गटाला पूर्ण बहुमत मिळाले. तर जळगाव, पाचोरा, अमळनेर, रावेर आणि बोदवड या पाच कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीने बहुमत मिळवले. जिल्ह्यातील पाचोरा भडगाव बाजार समिती मात्र त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. शिंदे फडणवीस अर्थात आमदार किशोर आप्पा पाटील (Kishore Appa Patil) यांच्या पॅनलला १८ पैकी ९ जागा मिळाल्या. महाविकास आघाडीला ७ आणि शिंदे फडणवीस यांच्या २ जागा आल्याने कोणालाच बहुमत मिळाले नाही. आमदार किशोर आप्पा पाटलांच्या बहुमतासाठी एक जागा कमी मिळाली. त्यामुळे आता सर्वाधिक जागा असलेल्या आ. किशोर पाटलांना त्यांच्या सभापती बनण्याचा असेल तर एक जागा महाविकास आघाडी अथवा शिंदे गटाची साथ घ्यावी लागणार आहे. आमदार किशोर आप्पा पाटील आणि शिंदे गटाचे विळा भोपळ्याचे नाते पाहता शिंदे गटाकडून किशोर आप्पांना साथ मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील एक सदस्य किशोर आप्पांना फोडावा लागणार आहे. महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे उमेदवार उद्धव मराठे यांना सभापती पदाचे अथवा इतर आमिष दाखवून वश करण्याचा प्रयत्न आमदार किशोर आप्पा पाटील करतील. आणि सभापती पद आपल्या पॅनलला येईल या दृष्टीने प्रयत्न करतील. ही एक शक्यता वर्तवली जात आहे. परंतु उद्धव मराठी हे महाविकास आघाडीच्या नेत्या उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी (Vaishali Suryavanshi) यांचे सहकारी असल्याने उद्धव मराठे यांच्यावर फार मोठा दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु मोठे अमिष दाखवून त्यांना फोडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. दुसरी शक्यता महाविकास आघाडी पॅनलचे माजी आमदार दिलीप वाघ आणि आमदार किशोर आप्पा पाटील यांची मैत्री सर्वश्रुत आहे. कारण जिल्हा बँक आणि दूध संघाच्या निवडणुकीत आमदार किशोर आप्पा आणि दिलीप वाघ यांनी आपापसात साटेलोटे करून दोघेही बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे दिलीप वाघ यांनी आपला एक सदस्य किशोर आप्पांना देऊन त्याला उपसभापती पद देण्याची भर घालतील आणि किशोर आप्पांच्या पॅनलच्या सभापती पदाचा मार्ग मोकळा होईल. ही सुद्धा एक शक्यता वर्तवली जात आहे. या दोन्ही शक्यता अशक्य झाल्या तर शेवटचा पर्याय म्हणून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना किशोर आप्पा भेटून त्यांना गळ घालतील की, शिंदे गटाच्या दोन्ही सदस्यांना सभापती पदाच्या निवडणुकीच्या मतदानाला गैरहजर राहायला सांगितले जाईल. परंतु शिंदे गट आणि किशोर आप्पा यांच्यातील संबंध पाहता हे कितपत शक्य होईल आणि त्याला अमोल शिंदे संमती देण्याची शक्यता नाही. उलट अमोल शिंदे महाविकास आघाडीच्या पॅनलला सहकार्य करतील, असे राजकीय सूत्रांचा दावा आहे. कारण आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार दिलीप वाघ यांचे सहकार्य मिळवण्यात त्यांचा प्रयत्न अमोल शिंदे करत आहेत. यापुढे पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदाचा फार मोठा निर्णय तिढा निर्माण झाला आहे.

येत्या तीन-चार दिवसात जळगाव जिल्ह्यातील सर्व बारा बाजार समिती यांच्या सभापती पदाची निवडणूक कार्यक्रम जिल्हा उपनिबंधक यांच्यातर्फे जाहीर केल्या जाईल. तेव्हा पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदाची निवडणूक चुरशीची होणार आहे. आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवून पक्षांच्या हालचाली होत आहेत. जिल्ह्यात सर्वात मोठा फटका पारोळा बाजार समिती आमदार चिमणराव पाटील पिता पुत्रांना बसला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री डॉक्टर सतीश अण्णा पाटील यांनी रंगीत तालमीत बाजी मारली आहे. आमदार चिमणराव पाटील पिता पुत्रांचा पराभव हा त्यांच्यासाठी फार मोठा धक्का आहे, एवढे मात्र निश्चित. कारण पारंपारिक प्रतिनिधी स्पर्धे डॉक्टर सतीश पाटील यांना एक प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या विजयाने फार उत्साह निर्माण झाला आहे. आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीचे आलेख आखले जात आहेत. त्यात कोर्टाचा निकाल शिंदे सरकारच्या विरोधात गेला तर आमदार चिमणराव पाटील (MLA Chimanrao Patil) फार मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. अशीच परिस्थिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदार संघाची झाली आहे. जळगाव बाजार समिती महाविकास आघाडीने बाजी मारून माजी मंत्री गुलाबराव देवकरांनी (Gulabrao Devkar) आपले वर्चस्व सिद्ध केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांचा उत्साह वाढला आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.