मगरीच्या हल्ल्यात फुटबॉलपटूचा मृत्यू

0

नवी दिल्ली ;- कोस्टारिकाच्या फुटबॉलपटूवर मगरीने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला. जीसस अल्बर्टो लोपेज ऑर्टिज असे फुटबॉलपटूचे नाव आहे. ऑर्टिज नदीत पोहत असताना तिथे एक मगर आली. तिने ऑर्टिजवर हल्ला केला. आसपासच्या लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. ऑर्टिजचा मृतदेह मगरीच्या तोंडातून काढण्याचे प्रयत्न सुरू होते.

मात्र मगर त्याचा मृतदेह सोडत नव्हती. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी मगरीवर गोळी मारली. या घटनेचा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाला आहे. फुटबॉलपटू जीसस अल्बर्टो लोपेझ ऑर्टिज हा चुचो नावाने प्रसिद्ध होता. डेपोर्टिवो रियो कैनास टीमकडून तो फुटबॉल खेळायचा.लोपेझला दोन मुलं आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबानं लोकांकडे मदतीची मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.