मध्य रेल्वेकडून उत्सव विशेष रेल्वे सेवा

0

भुसावळ ;– प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सणासुदीच्या काळात अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस – नागपूर आणि दानापूर दरम्यान उत्सव विशेष अतिरिक्त रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

लोकमान्य टिळक टर्मिनस -नागपूर द्विसाप्ताहिक विशेष (२२ सेवा) २२ LHB कोच ०१०३३ द्वि-साप्ताहिक सुपरफास्ट २६.१०.२०२३ ते ३०.११.२०२३ (११ सेवा) दर मंगळवार आणि गुरुवारी २०.१५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी १०.२५ वाजता नागपूरला पोहोचेल.
०१०३४ साप्ताहिक सुपरफास्ट २७.१०.२०२३ ते ०१.१२.२०२३ (११ सेवा) पर्यंत दर बुधवार आणि शुक्रवारी १३.३० वाजता नागपूरहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी ०३. ३५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.

थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा आणि नागपूर
रचना: १ प्रथम श्रेणी वातानुकूलित, २ वातानुकूलित 2-टियर , १५ वातानुकूलित ३-टियर भोजनयान (पॅन्ट्री कार) आणि दोन जनरेटर व्हॅन.
आरक्षण: विशेष ट्रेन क्रमांक ०१०३३ साठी विशेष शुल्कावर लवकर बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर लगेच उघडेल.

२) लोकमान्य टिळक टर्मिनस-दानापूर साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (११ सेवा) २४ ICF कोच

०१४०९ साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस २८.१०.२०२३ ते ०२.१२.२०२३ (०६ सेवा) दर शनिवारी १२.१५ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी १७.०० वाजता दानापूरला पोहोचेल.
०१४१० साप्ताहिक स्पेशल २९.१०.२०२३ ते ०३.१२.२०२३ (०६ सेवा) दर रविवारी दानापूर येथून १८.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २३.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.

थांबे: कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा आणि दानापूर.
रचना: २ गार्ड ब्रेक व्हॅनसह २४ सामान्य द्वितीय श्रेणी (त्यातील १० डबे आरक्षित स्थितीत चालवले जातील)
आरक्षण: विशेष शुल्कावर विशेष ट्रेन क्रमांक ०१४०९ चे बुकिंग २७.१०.२०२३ रोजी संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर होईल

Leave A Reply

Your email address will not be published.