धक्कादायक; प्रेमसंबंध निर्माण करून १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी गर्भवती

आरोपीविरोधात गुन्हा दाखल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत गेल्या वर्षभरात गावातील एका मुलाने प्रेम संबंध निर्माण करीत तिच्यासोबत शारीरिक संबंध निर्माण करून तिला गर्भवती झाल्याची उघड झाल्यानंतर परिवाराला जबर धक्का बसला आहे. अल्पवयीन मुलीला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, याप्रकरणी अडावद पोलिसात एका विरोधात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनुसार, चोपडा तालुक्यात एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून, दि. १ तर ३१ मार्च २०२३ या महिन्याभरात तरुणाने चोपडा व जळगाव येथील त्याच्या मित्राच्या रूमवर तर अल्पवयीन मुलीच्या घरी येऊन देखील वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला आहे. या प्रकरणी अडावद पोलिसात संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश बुआ करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.