लोकशक्ती प्रतिष्ठानच्या मोफत मतदान कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

जळगाव ;– लोकशक्ती प्रतिष्ठानतर्फे शाहूनगर प्रभाग क्र. 5 येथे ठेवण्यात आलेल्या मोफत मतदान कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ह्या शिबिरात एकूण 800 लोकांचे मतदान कार्ड नोंदणी व दुरुस्ती करण्यात आली. ह्या प्रसंगी प्रतिष्ठानचे सचिव फैजान शेख व प्रसिद्धी प्रमुख इरफान शेख ह्यांचा सिंहाचा वाटा होता तसेच हे शिबीर अध्यक्षा धाराताई ठाकर, सरचिटणीस सरला ताई सैंदाणे, मार्गदर्शक अँड विजय दाणेज सर व संस्थापक पराग घनश्याम कोचुरे ह्यांच्या उपस्थितीत पार पडला. आम आदमी पार्टीच्या अध्यक्षा अमृता ताई नेटकर ह्यांनी लाभार्थ्यांना संबोधत हे शिबीर डॉ. घनश्याम कोचुरे ह्यांच्या आदर्शांना अनुसरून असून पुढेही त्यांच्या आदर्शांना धरूनच लोकशक्ती प्रतिष्ठान काम करत राहील हे आश्वासित केले.

याप्रसंगी संघटक रईस भाई कुरेशी, युवा नेते सूरज तडवी ह्यांनी देखील उत्स्फुर्तपणे सहभागी होऊन प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले व पाठींबा दर्शविला. ह्या कार्यक्रमात युसूफ खान, ज्ञानेश्वर साळुंखे. पवन नेमाडे, जयश्री पाटील. आबीद शेख, रईस शेख, ममता तडवी , नीलिमा शेवाळे , सोनू साळुंखे , अयान मिर्झा , पुष्पक कोचुरे, मतीन पटेल , समीर शहा व इतरही कार्यकर्ते/ पदाधिकाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.