आजच्या तरुणाईच्या पालकत्वाची भूमिका: विकनेस की सपोर्ट?

0

लोकशाही विशेष लेख

आपल्या आयुष्याची सुरुवात आपल्या आई वडिलांमुळेच होत असते. आपलं संपूर्ण आयुष्य, आपलं सामाजातील स्थान, शिक्षण हे सर्व आपल्याला त्यांच्यामुळेच मिळालेलं आहे. आणि हे सर्व करताना त्यांच्या या सर्व मेहनतीची कशाशीच तुलना करता येणार नाही, हे ही तितकंच खरंय.. आज आपण आत्मविश्वासाने उभे आहोत तर ते फक्त आपल्या आई वडिलांमुळेच.. आयुष्याच्या प्रवासात आपण विविध टप्पे पार करूनच पुढे येतो, आणि त्या त्या वेळचे कर्तव्य आपण करत असतो. आपण जे कर्तव्य करतो त्यातून आई-वडिलांना समाधान देत असतो. हे सर्व अगदी बरोबर असलं, तरी या सगळ्यांमध्ये आपले आपसातील जे नाते आहे, बॉंडिंग आहे ते आता तेवढंच स्ट्रॉंग राहिलेलं दिसत नाही.

आज माझ्यासमोर खूप काही उदाहरणे मला दिसली. सर्व काही असताना सुद्धा पालक आणि मुले हे मनाने एकत्र नाहीत. आता इथे असं का झालं? असा प्रश्न तुम्हालाही निर्माण झाला असावा! हे साहजिक आहे. कारण प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. तशा आपल्या नाण्याचाही दोन बाजू आहेत. एक बाजू पालक आणि दुसरी आपली… आपण जेव्हा जेव्हा चुकतो तेव्हा तेव्हा पालक आपली चूक सुधारण्यासाठी प्रयत्न करतात.. आपल्याला शिकवतात… आपल्याला समजावता… आपण वारंवार चुकलो, तर आपली बाकी मुलांसोबत तुलना सुरू होते आणि मग हळूहळू तसा ग्रह मनात ठेवून मुलांचा तिरस्कार होण्यास सुरुवात होते. दुसरी गोष्ट अशी की, जरी आपण सर्व गोष्टींमध्ये पुढे असले, हुशार असले तर मग पालकांसाठी ही खूप अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट ठरते…

मुलांनाही वाटत असतं ‘आपण आपल्या आई-वडिलांसाठी खूप काही कराव’.. आणि ती करतातही.. पण यातही काही यशस्वी होतात तर काही जण होत नाही.. पण काय आहे ना, हे सर्व होणं न होणं, हुशार असणं किंवा नसणं, यशस्वी असणं किंवा नसणं या सर्व गोष्टी फक्त समाजातील एक प्रतिष्ठेसाठी आपल्या पालकांनी सध्या ठरवून घेतल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी कळत नकळत त्या अपेक्षांचं ओझं मुलांवर येत आहे.

मुलं एखादी गोष्ट करू शकत नाही तर त्यामागे काय कारण आहे, हे बघायला हवं… मग तो का कमी पडतोय? त्याला नेमकं काय हवंय? हे सुद्धा बघणं गरजेच आहे. मुलं चुका करतात, खूप करतात.. वारंवार करतात… कारण त्यांना प्रत्येक गोष्ट नवीन असते… उलट या ठिकाणी सर्वात महत्त्वाची भूमिका ही आई वडिलांचे असते. ज्या ज्या वेळी मुलं वारंवार चुकतात त्या त्या वेळी आई वडील कमी पडलेले असतात.. (विशेषतः भावनिक दृष्ट्या)..

सर्वांनी ठरवून घेतलेला साचा म्हणजे ‘जन्म, लहानपण, कॉलेज, नोकरी, लग्न….’ या प्रत्येक वळणावरून जाताना प्रत्येकाची गरज वेगळी असते. बऱ्याच गोष्टी पालकांच्या लक्षात येतच नाहीत किंवा त्या गोष्टीकडे ते गांभीर्याने लक्षच देत नाही.. मला फक्त एकच म्हणायचंय कि, आज सर्व काही सुख सुविधा असताना देखील जेव्हा मुलं नाराज असतात. बऱ्याच वेळा ते व्यक्तही होत नाही. त्यांच्या बोलण्यातून ना कधीतरी दिसून येऊ पण देत नाही त्यावेळी चुकी आई-वडिलांचे असते असं मला वाटतं. कारण त्या वेळेला मुलं ही जवळ असून देखील मनाने खूप दूर गेलेले असतात. आपल्या सर्वांपासूनही आणि स्वतःपासूनही.. फक्त फॉर्मलिटी म्हणून सर्व गोष्टी घडत असतात..

आदरणीय पालक मी पूर्णतः तुम्हाला दोष देत नाहीये.. पण आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाला आपली काही किंमत नसते. मग त्या समाजातील खोट्या प्रतिष्ठेसाठी आपण आपल्या मुलांवर अपेक्षांचं ओझे टाकतोय? हे आपण सर्वात आधी समजून घ्यायला हवं. आपल्या मुलांची कला, वैशिष्ट्ये, कॉलिटी ओळखून त्यांच्या भावनांचा विचार करणं गरजेचं आहे. मुलं जर नाराज असतील तर आई-वडीलही कधीच खुश नसतात. आई-वडिलांचा सपोर्ट, त्यांनी दिलेला आत्मविश्वास हाच एकमेव आधार मुलांना खूप पुढे नेणारा असतो. म्हणून आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा… कधीतरी सर्व कामातून वेळ काढून एकत्र बसा… मनमोकळेपणे त्यांच्याशी बोला.. कधीतरी त्यांना बाहेर एकांती घेऊन जा.. त्यांना जवळ घ्या.. त्याच्या मनात काय चाललंय हे एका मित्राप्रमाणे समजून घ्या.. त्यांना त्यांचे निर्णय स्वतः घ्यायला शिकवा.. चुकू द्या.. कारण चुकतील तेव्हाच ती तर ती शिकतील.. आणि जर तो खरंच चुकत असेल तर त्याला समजावून सांगा… त्यांना दोष देण्याआधी त्यांच्यासोबत एकदा उभे रहा…

आपण त्यांना एवढं खंबीर करावं की, कुठल्याही परिस्थितीत ते डगमगता कामा नये. सर्व गोष्टी त्यांनी स्वतः हाताळल्या पाहिजेत; त्या ही पूर्ण आत्मविश्वासाने. मुलांच्या सर्वात जवळचे फक्त आई वडील असतात.. मात्र हे नातं जे आहे ते सर्व नात्यांचं मिळून एक नातं असावं.. अगदी आजी-आजोबा, बहिण-भाऊ, शिक्षक, मित्र-मैत्रिणी, सर्वच.. तेव्हाच आपण एकमेकांना समजून घेऊ शकतो. तुम्हालाही मुलांच्या अडचणी समजू शकतील.. कारण वास्तविक आम्ही कितीही मोठे झालो, तरी तुमच्या पेक्षा आम्ही नेहमी लहानच असतो, हे नाकारूनही चालणार नाही याची समज आम्हालाही असते.. शेवटी बस एवढंच सांगायचंय की, त्यांना त्यांच्या मनाचे स्वातंत्र्य द्या.. त्यांच्याशी एकरूप व्हा.. त्यांच्या विकनेस नाही तर सपोर्ट बना… मग बघा खरी जादू..

डॉ. प्रज्वल सागर नाईक
कोपरगाव.

Leave A Reply

Your email address will not be published.