राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ६३४५ प्रकरणे निकाली काढण्यात यश

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

दि. ०७-०५-२०२२ रोजी जळगाव जिल्हा न्यायालय, सर्व तालुका न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, जिल्हा ग्राहक तक्रार आयोग, सहकार न्यायालय येथे मा. ना. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेशाप्रमाणे दि. ०७-०५-२०२२ रोजी न्यायालयातील प्रलंबित व वादपुर्व अशी एकुण ५६४०६ तडजोड पात्र प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती.

सर्व न्यायाधीश वृंद, वकिल, न्यायालयीन कर्मचारी, दोन्ही बाजुचे पक्षकार यांचे मदतीने ५५२३ दाखलपुर्व व न्यायालयातील प्रलंबीत ८२२ प्रकरणे निकाली काढण्यात आली व त्या माध्यमातुन एकुण रक्कम रुपये ६२,३८,११,१७२/- वसुल करण्यात आले. तसेच कौटुंबिक न्यायालयाचे १५ प्रकरणे व जिल्हयात स्पेशल ड्राईव्ह मार्फत २२४ प्रकरणे, व जिल्हयातील प्रलंबित सर्व पोलीस चलान चे शेकडोच्या संख्येने प्रकरणे निकाली काढण्यात आली.

एस. डी. जगमलाणी, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, साो. जळगांव, ए. ए. के. शेख, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव दिलीप बोरसे, अध्यक्ष, जिल्हा वकिल संघ, जळगांव प्रभाकर पाटील, उपाध्यक्ष, जिल्हा वकिल संघ जळगांव दर्शन देशमुख, सचिव, जिल्हा वकिल संघ व जिल्हा वकिल संघाचे सर्व सदस्य, केतन ढाके, जिल्हा सरकारी अधियोक्ता, तसेच पॅनल न्यायाधीश आर. एन. हिवसे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश – १, व्हि. बी. बोहरा, तदर्थ जिल्हा न्यायाधीश – ३, व्हि. व्हि. मुगळीकर, मुख्य न्यायदंडाधिकारी, व्हि. जी. चौखंडे, दिवाणी न्यायाधीश व. स्तर भुसावळ, पी. ए. श्रीराम, ७ वे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, आर वाय खंडारे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, तसेच अॅड शरद न्यायदे, ॲड महिमा मिश्रा, अॅड हाशिम खाटीक, अॅड बी. जी. कापुरे, अॅड विजय दर्जी, अॅड सी. आर. सपके, अॅड योगेश जे पाटील, अॅड एस. एच. निकम, अॅड मुजीब पठाण, अॅड आर. टी. बावीस्कर, अॅड लिना म्हस्के, अॅड संदीप जी पाटील, तसेच विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालयीन अधिक्षक, रविंद्र एस ठाकुर, व कर्मचारी अविनाश कुळकर्णी, प्रमोद पाटील, प्रमोद ठाकरे, गणेश निंबोळकर, चंद्रवदन भारंबे, प्रकाश काजळे, भालचंद्र सैंदाणे, तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे समांतर विधी सहाय्यक आरिफ पटेल, जावेद एस पटेल, आदिंनी मेहनत घेवुन लोक अदालत यशस्वी केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.