Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»ऑनलाईन फसवणुकीतून डॉक्टरला ४९ हजारांचा गंडा
    गुन्हे वार्ता

    ऑनलाईन फसवणुकीतून डॉक्टरला ४९ हजारांचा गंडा

    Tushar BhambareBy Tushar BhambareMay 9, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार उघडकीस येत आहेत. जळगाव शहरातील एका डॉक्टराला बँकतून बोलत असल्याचे सांगून ४९ हजाराची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सदर डॉक्टर हे जळगाव शहरातील जोशी पेठ येथे आपल्या कुटुंबियांसह राहतात. १५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता त्यांना ८११४१७५१७३ क्रमांकावरून अनोळखी महिलेचा फोन आला. आपण आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून आपल्या बँक खात्यातून ट्रॅन्झॅक्शन होत आहे. ते बंद करावे लागेल. तुम्ही बंद करणार नाही तर दर महिन्याला तुमच्या खात्यातून ४९३१२ रूपये भरावे लागतील असे सांगून डॉक्टरला ओटीपी नंबर बोलण्यात फसवणूक करून विचारून घेतला.

    दरम्यान लागलीच डॉक्टरच्या खात्यातून ४९ हजार ६१२ रूपये कमी झाल्याचा मॅसेज आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून रविवारी ८ मे रोजी शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरूडे करीत आहे.

    crime news Fraude News
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या

    May 13, 2026

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif