बिबट्याने ने केल्या दोन शेळ्या फस्त

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

रावेर; येथे कांडवेल शेती शिवारात आज दोन शेळ्या बिबट्याने ठार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

कांडवेल शेती-शिवार मध्ये बिबट्याने दोन शेळ्या फस्त केल्या आहे. यामुळे कांडवेल परिसरातील शेतकरी व नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती वनपाल अतुल तायडे यांना समजताच ते आपल्या कर्मचाऱ्‍यांसह घटना स्थळी गेले व पगमार्ग बघितले असता हल्ला करणारा प्राणी बिबट असल्याचे निष्पन्न झाले.

वनपाल अतुल तायडे यांनी नागरीकांना सर्तक राहण्याच्या सूचना केल्या असून बिबट्यासाठी या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.