अखेर वनविभागाने घडवली बिबट्या मादी अन् बछड्याची भेट.

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

सांगली :अखेर वनविभागाने घडवली बिबट्या मादी अन् बछड्याची भेट. ​शिवारात शेतकऱ्यांची चाहूल लागताच बछड्यास तिथेच सोडून पळ काढलेल्या बिबट्या मादी अन् बछड्याची वनविभागाने अखेर भेट घडवून आणली. बिबट्या मादीने आपल्या बछड्यास रात्रीच्या सुमारास अलगद उचलून नेले. यांचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला आहे. यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

शिराळा तालुक्यातील वाटेगाव येथील शेतकरी शिवाजी गावडे यांच्या खोरी शिवारात ऊसतोड सुरू असताना मंगळवारी (दि.२५) रात्री बिबट्या मादी व तिचा बछडा ऊसतोड मजुरांना दिसला. मजुरांची चाहूल लागताच तिथून बिबट्या मादीने बछड्याला तिथेच सोडून पळ काढला. शेतकऱ्यांनी याची माहिती वनविभागाला दिली.

वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी मादी व बछड्याची भेट घडून आणण्याची व्यवस्था करुन ट्रॅप कॅमेरे लावले. रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास मादी बिबट्याने येऊन बछड्याला अलगद उचलून नेले. याचा व्हिडिओ वनविभागाच्या ट्रॅप कॅमेरात कैद झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. उपवनसंरक्षक विजय माने, सहाय्यक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे, वनक्षेत्रपाल सचिन जाधव यांचे मार्गदर्शनाखाली शिराळा वनपरिक्षेत्रातील वनअधिकारी व कर्मचारी यांनी ही कामगिरी केली.

गेल्या काही महिन्यांपासून मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढला आहे. जनावरांवर तसेच लहान बालकांवरील हल्ल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. वनविभागाने या बिबट्यास पकडून नैसर्गिक अधिवासात सोडावे अशी मागणी नागरिकांमधून वेळोवेळी केली जात आहे. मात्र वनविभागालाच हे बिबट्या चकवा देत आहेत. दरम्यान वाटेगाव येथील बछड्याची अन् बिबट्या मादीची वनविभागाने भेट घडवली

Leave A Reply

Your email address will not be published.