लासगावच्या बेपत्ता महिलेचा चिमुकल्यासह विहिरीत आढळला मृतदेह

0

सुरेश रामदास पाटिल(बापू पाटिल)

लासगाव ता. पाचोरा ;- येथील २० वर्षीय महिला आपल्या ५ महिन्याच्या मुलासह २८ मे रोजी ३ ते ४ वाजेच्या सुमारास घारतून निघून गेल्याची फिर्याद तिच्या पतिने दिली होती. आज सकाळी आई आणि मुलाचा मृतदेह एका विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, लासगाव येथील लासगाव ता. पाचोरा येथील आरिफ शेख यांचा विवाह गावातीलच त्यांचे मामाची मुलगी लजिनाबी हिच्याशी झाला होता.ते मजुरी करून आपली उपजीविका भागवितात . त्यांची पत्नी लजीनाबी आरिफ शेख वय २० आणि ५ महिने वयाचा असद नावाचा मुलगा असून त्यांची पत्नी हि मुलाला २८ रोजी दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास घरातून कुणास काहीही न सांगता निघून गेल्याची तक्रार आरिफ शेख यांनी पाचोरा पोलीस स्टेशनला दिली होती.

 

त्यानुसार हरविल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र आज लजीनाबी शेख आणि चिमुकला असद यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला . घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ, पोलिस कॉन्स्टेबल मुकुंद परदेशी, राहुल बेहरे, दिलीप वाघमोडे हे पथक व रुग्णवाहिका चालक अमोल पाटील घटनास्थळी दाखल होवून घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा करण्यात आला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नसून मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोना मुकुंद परदेशी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.