लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिरात वार्षिक स्नेहसंमेलन साजरा

0

भडगाव, लोकशाही न्युज नेटवर्क

कर्मवीर तात्यासाहेब हरिरावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर भडगाव शाळेत शैक्षणिक वर्षाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे चेअरमन तसेच जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रतापराव हरि पाटील, संस्थेच्या सचिव तसेच जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालिका डॉ. पुनम पाटील, शाळेतील शिक्षक पालक संघातील सदस्य प्रा. अतुल देशमुख, माता पालक सदस्या प्राजक्ता देशमुख, संस्थेतील विविध शाखांमधील मुख्याध्यापक वैशाली पाटील, रविंद्र वळखंडे, बी.पी. पवार, विलास पाटील, उपमुख्याध्यापक बी.जे. पाटील सर हे मान्यवर उपस्थित होते.

सदर वार्षिक स्नेहसंमेलन अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वहस्ताक्षरात अतिशय सुंदर पध्दतीने तयार केलेल्या रंगोत्सव २०२२ या हस्तलिखिताचे प्रकाशन संस्थेच्या सचिव व जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालिका डॉ. पुनम प्रशांत पाटील यांचे शुभहस्ते प्रकाशित करण्यात आले. डॉ. पुनम पाटील यांचा सत्कार जळगाव जिल्हा दुध संघ निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल संस्थेच्या सचिव डॉ. पुनम पाटील यांच्यातर्फे विठ्ठल रखुमाईंची आकर्षक मुर्ती देऊन सत्कार करण्यात आला.

शाळेतील शिक्षकांना प्रेरणा मिळावी व त्यांनी अधिक जोमाने शैक्षणिक कार्य करावे या संकल्पनेतुन दरवर्षी शाळेतर्फे शाळेतील एका शिक्षकाला आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. या वर्षी शाळेतील उपशिक्षक सुयोग पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार तर शाळेतील प्रत्येक वर्गातुन एक आदर्श विद्यार्थी निवडुन ८ विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार संस्थेचे चेअरमन व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रतापराव हरि पाटील यांचे हस्ते करण्यात आला. त्याचप्रमाणे व्ही. स्कुल ॲप वर उत्कृष्ट पद्धतीने अभ्यास करून राज्य मानांकन मिळविणारा शाळेतील विद्यार्थी हार्दिक पाटील आणि त्याच्या पालकांचा देखील विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

मन जिंकणारा सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अतिशय आकर्षक पोशाखात उत्कृष्ट पद्धतीने आपली सामुहिक नृत्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकून घेतली. सांस्कृतिक कार्यक्रमात तब्बल 182 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील पालक व नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. संपुर्ण कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील उपशिक्षक ज्ञानेश्वर गांगुर्डे, प्रास्ताविक सचिन पाटील तर मान्यवरांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील उपशिक्षिका संगिता शेलार, सुनिता देवरे, अनिता सैंदाणे, उपशिक्षक सचिन पाटील, रविंद्र पांडे, अनंत हिरे, ज्ञानेश्वर गांगुर्डे, सुयोग पाटील, सचिन लक्ष्मण पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.