‘कसबा’ चित्रपटाचे दिग्दर्शक ‘कुमार साहनी’ यांचे निधन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पटकथाकार कुमार साहनी यांचे निधन झाल्याचे बातमी समोर आली आहे. त्यांनी वयाच्या 83 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. माया, दर्पण आणि कसबा सारख्या वेगळ्या विषयांवरील चित्रपटांची निर्मिती करून सहानी हे चर्चेत आले होते.

सहानी यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बऱ्याच दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती. केवळ दिग्दर्शनच नाही, तर एक प्रख्यात शिक्षक पटकथाकार म्हणून देखील त्यांची वेगळी ओळख आहे. त्यांच्या निधनानं बॉलीवूडलाही मोठा धक्का बसला आहे. साहनी यांच्या निधनाचे वृत्त कळताच बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

माया दर्पण, तरंग, ख्याल गाथा आणि कसबा सारख्या चित्रपटांची निर्मिती करून साहनी लोकप्रिय झाले. त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. ७ डिसेंबर १९४० रोजी लरकाना शहरात जन्म झालेल्या कुमार यांनी उद्योगधंद्यासाठी मुंबई शहराची निवड केली. या शहरातच त्यांनी पुढे त्यांच्या नावाची मोहोर उमटवली. पुण्यातील एफटीआय इन्स्टिटयूडमधून त्यांनी चित्रपट दिग्दर्शनाचे धडे घेतले. त्यानंतर ते फ्रान्सला गेले आणि तिथेही त्यांनी दिग्दर्शनाचे धडे गिरवले.

फ्रान्समध्ये असतांना त्यांना रॉबर्ट ब्रेसन नावाच्या कलाकारांकडून मोठी प्रेरणा मिळाली. ते त्यांना आपले शिक्षक मानत असतं. निर्मल वर्मा यांच्या माया दर्पण नावाच्या चित्रपटाची निर्मिती करून सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कारही जिंकला होता. यासह त्यांच्या तरंग, ख्याल गाथा, कसबा आणि चार अध्याय सारख्या चित्रपटांचे देखील प्रेक्षकांनी कौतुक केले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.