अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत क्रीडांगण विकास अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

जिल्हा नियोजन समिती, जळगाव यांच्या वतीने उपलब्ध अनुदान अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव मार्फत अनुसुचित जाती उपयोजना अंतर्गत क्रीडांगण विकास अनुदान २०२३–२४ साठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी २४ जुलै पर्यंत प्रस्ताव सादर करावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

अनुसुचित जाती (एस.सी) संवर्गासाठी कार्यरत अशा सर्व शासकीय/ संस्था संचलित अनुदानीत शाळा/ कनिष्ठ महाविद्यालये/ वसतिगृहे इत्यादी ज्यांना शिक्षण विभागाने, समाजकल्याण विभागाने मान्यता दिली आहे. ज्या अनुदानीत शाळा/ कनिष्ठ महाविदयालये/ वसतीगृहे यांचेकडे फक्त क्रीडांगणासाठी जवळपास १.५ एकर किवा त्यापेक्षा जास्त जागा उपलब्ध आहे किंवा विहित खेळाचे मैदाने तयार करण्यासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध आहेत. ते अनुदान प्राप्तीसाठी प्रस्ताव सादर करु शकतात.

या योजनेअंतर्गत क्रीडागंण समपातळीत करणे, २०० मीटर अथवा ४०० मीटर धाव मार्ग तयार करणे, क्रीडांगणास भिंतीचे / तारेचे कुंपण घालणे, विविध खेळांचा एक किंवा अधिक प्रमाणित क्रीडांगण तयार करणे, प्रसाधनगृह / चेंजीग रुम बांधणे, पिण्याच्या व मैदानावर मारण्यासाठी आवश्यक पाण्याची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य ठेवण्यासाठी भांडारगृह बांधणे, क्रीडागणावर  पल्ड लाईटची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य खरेदी करणे, क्रीडांगणावर मातीचा / सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी/ आसन व्यवस्था तयार करणे, प्रेक्षक गॅलरीवर / आसन व्यवस्थेवर शेड तयार करणे, क्रीडांगणाभोवती ड्रेनेज व्यवस्था करणे, निर्मित सुविधा विचारात घेवून मैदानावर पाणी मारण्यासाठी यंत्रणा बसविणे व मैदानावर रोलींग करण्यासाठी मिनी रोलर खरेदी करणे, इत्यादी बाबींसाठी क्रीडा उपक्रमाची आवश्यकता असल्याची खात्री केल्यनंतर अनुदान मंजुर करण्यात येते. अंदाजित खर्चाच्या १०० टक्के किंवा कमाल ७ लाख रूपयांपर्यतचे अनुदान यापैकी जी रक्कम कमी असेल इतकी रक्कम अनुदान म्हणून देण्यात येईल. मात्र क्रीडा साहित्यासाठी कमाल 3 लाख रूपये अनुदान मर्यादा राहील. क्रीडा साहित्य मागणी प्रस्तावांसाठी शाळा / महाविदयालय/ वसतीगृहे यांच्याकडे सदर मैदान/ हॉल उपलब्ध असणे आवश्यक आहे.

अनुदान मागणीचे प्रस्ताव सादर करणे संदर्भात, अर्जाचा विहित नमुना व अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे २४ जुलै २०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. अर्जासोबत असलेल्या यादीनुसार योग्य त्या कागदपत्रांच्या पूर्ततेसह संबंधितांच्या स्वाक्षरी व शिक्यानिशी मुळ दोन प्रतीत प्रस्ताव सादर करावा. असे आवाहन ही श्री.दीक्षित यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.